All Islam Directory
1

१. ग्रंथधारकंपैकी इन्कार करणारे आणि अनेकेश्वरवादी लोक आपल्या वर्तनापासून मागे हटणारे नव्हते, जोपर्यंत त्यांच्याजवळ उघड प्रमाण न यावे (आणि ते प्रमाण हे होते की).

2

२. सर्वश्रेष्ठ अल्लाहचा एक पैगंबर, जो पवित्र ग्रंथ वाचून दाखविल.

3

३. ज्यात उचित व स्पष्ट ईशआदेश असावेत.

4

४. ग्रंथधारक आपल्याजवळ स्पष्ट प्रमाण येऊन पोहचल्यानंतरच (मतभेदात पडून) विभाजित झाले.

5

५. वास्तविक त्यांना याखेरीज कोणताही आदेश दिला गेला नाही की त्यांनी फक्त अल्लाहचीच उपासना करावी, त्याच्याचकरिता दीन (धर्मा) ला विशुद्ध राखावे. (इब्राहीम) हनीफच्या दीन (धर्मा) वर आणि नमाजला कायम राखावे आणि जकात (कर्तव्य-दान) देत राहावे. हाच सरळ दीन (धर्म) आहे मुस्लिम संप्रदायाचा.

6

६. निःसंशय, जे लोक ग्रंथधारकांपैकी इन्कारी झाले. आणि अनेकेश्वरवादी, सर्वच्या सर्व जहन्नमच्या आगीत (जातील), ज्यात ते नेहमी (नेहमी) राहतील. हेच लोक सर्वांत वाईट निर्मिती होय.

7

७. निःसंशय, ज्या लोकांनी ईमान राखले आणि सत्कर्म केले, तर असे लोक (अल्लाहची) सर्वांत उत्तम निर्मिती होय.

8

८. यांचा मोबदला, त्यांच्या पालनकर्त्याजवळ निरंतर राहणाऱ्या जन्नती आहेत, ज्यांच्या खाली (थंड पाण्याचे) प्रवाह वाहत असतील, ज्यात ते सदैवकाळ राहतील. सर्वश्रेष्ठ अल्लाह त्यांच्याशी राजी झाला, आणि हे त्याच्याशी राजी झाले. हे (केवळ अशा माणसाकरिता आहे जो आपल्या पालनकर्त्याचे भय राखतो.१