1
१. जेव्हा जमिनीला पूर्णपणे थरथर हलविले जाईल.
2
२. आणि ती आपल्यात असलेले सर्व ओझे बाहेर काढून फेकेल.
3
३. मनुष्य म्हणू लागेल की हिला झाले तरी काय?
4
४. त्या दिवशी जमीन आपला सर्व अहवाल सादर करील.
5
५. यासाठी की तुमच्या पालनकर्त्याने तिला तसा आदेश दिला असेल.
6
६. त्या दिवशी लोक वेगवेगळ्या जमाती बनून (परत) फिरतील यासाठी की त्यांना त्यांची कर्मे दाखविली जावीत.
7
७. तेव्हा, ज्याने कणाइतकेही सत्कर्म केले असेल, तो ते पाहील.
8
८. आणि ज्याने कणाइतकेही दुष्कर्म केले असेल, तो ते पाहील.