१. तुम्ही सांगा, मी लोकांच्या पालनकर्त्याच्या शरणात येतो.
२. लोकांच्या स्वामीच्या (आणि)
३. लोकांच्या उपास्या (अल्लाह) च्या (आश्रयात)
४. (मनात) कुविचार टाकणाऱ्या, मागे हटणाऱ्याच्या उपद्रवापासून.
५. जो लोकांच्या मनात वाईट विचार टाकतो.
६. (मग तो) जिन्नांपैकी असो किंवा माणसांपैकी.