ऑल इस्लाम लायब्ररी
1

१. निःसंशय, आम्ही या (कुरआना) ला कद्र (बरकती) च्या रात्री अवतरित केले.

2

२. तुम्हाला काय माहीत की कद्रची रात्र काय आहे?

3

३. कद्रची रात्र एक हजार महिन्यांपेक्षा उत्तम आहे.

4

४. या रात्री (प्रत्येक कार्य पार पाडण्यास) आपल्या पालनकर्त्याच्या आदेशाने फरिश्ते आणि रुह (जिब्रील) अवतरित होतात.

5

५. ही रात्र पूर्णपणे सलामतीची असते आणि प्रातःकाळाचा उदय (पहाट) होईपर्यंत असते.