All Islam Directory
1

१. शपथ आहे सूर्याची आणि त्याच्या उन्हाची.

2

२. शपथ आहे चंद्राची जेव्हा त्याच्या मागे येईल.

3

३. शपथ आहे दिवसाची जेव्हा सूर्याला प्रकट करील.

4

४. शपथ आहे रात्रीची जेव्हा त्याला झाकून टाकील.

5

५. शपथ आहे आकाशाची आणि त्याला बनविण्याची.

6

६. शपथ आहे जमिनीची आणि तिला समतल करण्याची.

7

७. शपथ आहे प्राणा (आत्म्या) ची आणि त्याला योग्य बनविण्याची.

8

८. मग समज दिली त्याला दुराचाराची आणि त्यापासून अलिप्त राहण्याची.

9

९. ज्याने या (आत्म्या) ला स्वच्छ शुद्ध केले, तो सफल झाला.

10

१०. आणि ज्याने याला मातीत मिळवले तो असफल झाला.

11

११. समूद जनसमूहाने आपल्या विद्रोहामुळे खोटे ठरविले.

12

१२. जेव्हा त्यांच्यातला एक मोठा अभागी उठून उभा राहिला.

13

१३. त्यांना अल्लाहच्या पैगंबराने फर्माविले होते की सर्वश्रेष्ठ अल्लाहच्या सांडणीचे आणि तिच्या पिण्याच्या पाळीचे (रक्षण करा).

14

१४. त्या लोकांनी आपल्या पैगंबरांना खोटे जाणून त्या सांडणीला मारून टाकले. तेव्हा त्यांच्या पालनकर्त्याने त्यांच्या अपराधापायी त्यांना विनाशात टाकले आणि मग विनाशाला सार्वत्रिक केले आणि त्या संपूर्ण वस्तीला भुईसपाट करून टाकले.

15

१५. तो या प्रकोपाच्या परिणामापासून निर्भय आहे.