1
१. तुम्ही सांगून टाका की हे इन्कारी लोकांनो!
2
२. ना मी उपासना करतो त्याची, ज्याची तुम्ही उपासना करता.
3
३. ना तुम्ही उपासना करणारे आहात त्याची, ज्याची मी उपासना करतो.
4
४. आणि ना मी उपासना करेन त्याची, ज्याची तुम्ही उपासना करता.
5
५. आणि ना तुम्ही त्याची उपासना कराल, ज्याची मी उपासना करतो.
6
६. तुमच्यासाठी तुमचा दीन (धर्म) आहे आणि माझ्यासाठी माझा दीन (धर्म) आहे.