1
१. काय तुम्ही (त्यालाही) पाहिले जो मोबदल्याच्या दिवसाला खोटे ठरवितो.
2
२. हाच तो होय, जो अनाथाला धक्के मारतो.
3
३. आणि गरीबाला जेवु घालण्यास प्रोत्साहन देत नाही.
4
४. त्या नमाजी लोकांकरिता ‘वैल’ (नामक जहन्नमची एक जागा) आहे.
5
५. जे आपल्या नमाजांपासून गाफील आहेत.
6
६. जे केवळ देखावा दाखवितात.
7
७. आणि वापरण्याची वस्तू रोखून धरतात.