ऑल इस्लाम लायब्ररी
1

१. हे चादरीत लपेटून घेणाऱ्या,

2

२. रात्री (तहज्जुदच्या नमाजसाठी) उठून उभे राहा, परंतु थोडा वेळ.

3

३. अर्धी रात्र किंवा त्यापेक्षाही काही कमी.

4

४. किंवा त्यावर वाढवून आणि कुरआनाचे थोडे थांबून थांबून (स्पष्टतः) पठण करा.

5

५. निःसंशय, आम्ही तुमच्यावर एक भारदस्त गोष्ट लवकरच अवतरित करू.

6

६. निःसंशय, रात्रीचे उठणे मनाच्या एकाग्रतेकरिता फार योग्य आहे आणि कथनास मोठे दुरुस्त (उचित) करणारे आहे.

7

७. निश्चितच, दिवसा तुम्हाला अनेक कामे असतात.

8

८. आणि तुम्ही आपल्या पालनकर्त्याचे नामःस्मरण करीत जा आणि संपूर्ण सृष्टी (निर्मिती) पासून अलग होऊन त्याच्याकडे ध्यानमग्न व्हा.

9

९. पूर्व आणि पश्चिमेचा स्वामी, ज्याच्याखेरीज कोणीही उपास्य नाही. तुम्ही त्यालाच आपला कार्यसाधक (व संरक्षक) बनवा.

10

१०. आणि जे काही ते सांगतात, तुम्ही ते सहन करीत राहा आणि त्यांना चांगल्या प्रकारे सोडून द्या.

11

११. आणि मला व त्या खोटे ठरविणाऱ्या सुसंपन्न लोकांना सोडून द्या, आणि त्यांना थोडी सवड द्या.

12

१२. निःसंशय, आमच्याजवळ कठोर बेड्या आहेत, आणि धगधग पेटत असलेली जहन्नम आहे.

13

१३. आणि गळ्यात अडकणारे जेवण आहे आणि दुःखदायक अज़ाब आहे.

14

१४. ज्या दिवशी धरती आणि पर्वत कंपित होतील आणि पर्वत भुरभुरित वाळूच्या टेकड्यांसारखे होतील.

15

१५. निःसंशय, आम्ही तुमच्याकडेही तुमच्यावर साक्ष देणारा पैगंबर पाठविला आहे, जसा आम्ही फिरऔनकडे रसूल (पैगंबर) पाठविला होता.

16

१६. तेव्हा फिरऔनने त्या पैगंबराची अवज्ञा केली तर आम्ही त्याला घोर संकटात धरले.

17

१७. तुम्ही जर इन्कारी राहाल तर त्या दिवशी कसे सुरक्षित राहाल, जो दिवस लहान बालकांना वृद्ध करून टाकील.१

18

१८. ज्या दिवशी आकाश विदीर्ण होईल, अल्लाहचा हा वायदा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही.

19

१९. निःसंशय, हा बोध (उपदेश) आहे, तेव्हा जो इच्छिल त्याने आपल्या पालनकर्त्याकडे (जाण्या) चा मार्ग पत्करावा.

20

२०. निःसंशय, तुमचा पालनकर्ता चांगल्या प्रकारे जाणतो की तुम्ही आणि तुमच्यासोबत असलेल्या लोकांचा एक समूह सुमारे दोन तृतियांश रात्रीला आणि अर्ध्या रात्रीला आणि एक तृतियांश रात्रीला (तहज्जुदच्या नमाजसाठी) उभे राहतात, आणि रात्र-दिवसाचे पूर्ण अनुमान अल्लाहलाच आहे. तो (चांगल्या प्रकारे) जाणतो की तुम्ही ते मुळीच निभावू शकणार नाहीत, तेव्हा त्याने तुमच्यावर कृपा केली, यास्तव जेवढे कुरआन पठण करणे तुम्हाला सहज असेल, तेवढेच पठण करा. तो जाणतो की तुमच्यापैकी काही रोगीही असतील, दुसरे काही जमिनीवर हिंडून फिरून अल्लाहची कृपा (अर्थात रोजीरोटी) शोधतील आणि काही अल्लाहच्या मार्गात जिहादही करतील, तेव्हा तुम्ही जेवढे (कुरआन) पठण सहजपणे करू शकता, तेवढे करा, आणि नमाज नियमितपणे पढत राहा आणि जकात (देखील) देत राहा, आणि अल्लाहला चांगले कर्ज द्या, आणि जी नेकी (सत्कर्मे) तुम्ही आपल्या स्वतःसाठी पुढे पाठवाल ती अल्लाहच्या ठिकाणी सर्वोत्तमरित्या मोबदल्यात अधिक प्राप्त कराल. आणि अल्लाहजवळ माफी मागत राहा. निःसंशय, अल्लाह मोठा माफ करणारा, दया करणारा आहे.