All Islam Directory
1

१. आकाशांच्या आणि धरतीच्या समस्तू वस्तू अल्लाहच्या पावित्र्याचे गुणगान करतात जो बादशहा (सर्वसत्ताधीश) आणि मोठा पवित्र, वर्चस्वशाली (आणि) बुद्धिकौशल्य बाळगणारा आहे.

2

२. तोच आहे, ज्याने निरक्षर लोकांमध्ये त्यांच्यातूनच एक रसूल (पैगंबर) पाठविला, जो त्यांना त्याच्या आयती वाचून ऐकवितो आणि त्यांना स्वच्छ शुद्ध (पाक) करतो आणि त्यांना ग्रंथ व ज्ञान शिकवितो. निःसंशय हे यापूर्वी स्पष्ट अशा मार्गभ्रष्टतेत होते.

3

३. आणि दुसऱ्यांकरिताही त्यांच्यामधूनच जे अद्याप त्यांना सामील झाले नाहीत आणि तोच वर्चस्वशाली आणि हिकमत बाळगणारा आहे.

4

४. ही अल्लाहची कृपा आहे ज्याला इच्छितो आपली कृपा प्रदान करतो आणि अल्लाह मोठा कृपाळू आहे.

5

५. ज्या लोकांना तौरातनुसार काम करण्याचा आदेश दिला गेला, परंतु त्यांनी तो अमलात आणला नाही, त्यांचे उदाहरण त्या गाढवासारखे आहे ज्याने (पाठीवर) अनेक ग्रंथ लादलेले असावेत.१ अल्लाहच्या आयतींना याला खोटे ठरविणाऱ्यांचे फार वाईट उदाहरण आहे आणि अल्लाह अशा जुलमी लोकांना मार्गदर्शन करीत नाही.

6

६. सांगा की हे यहुद्यांनो! जर तुमचा हा दावा आहे की तुम्ही अल्लाहचे दोस्त आहात, इतर लोकांखेरीज, तर तुम्ही मृत्युची अभिलाषा करा जर तुम्ही सच्चे असाल.

7

७. हे मृत्युची कामना कधीही करणार नाहीत, (आपल्या) त्या कर्मांमुळे जी त्यांनी स्वहस्ते आपल्या आधी पाठविली आहेत आणि अल्लाह अत्याचारींना चांगल्या प्रकारे जाणतो.

8

८. सांगा की, ज्या मृत्युपासून तुम्ही पळ काढत आहात, तो तर तुम्हाला अवश्य येऊन गाठेल, मग तुम्ही सर्व, लपलेल्या व उघड गोष्टींना जाणणाऱ्या अल्लाहकडे परतविले जाल आणि मग तो दाखविल की तुम्ही कसकसे कर्म करीत राहिलात.

9

९. हे ईमान राखणाऱ्या लोकांनो! जुमअः (शुक्रवार) च्या दिवशी नमाजसाठी अजान दिली गेली असता तुम्ही अल्लाहच्या स्मरणाकडे त्वरित येत जा आणि खरेदी - विक्री सोडून द्या हे तुमच्यासाठी अधिक चांगले आहे, जर तुम्ही जाणत असाल.

10

१०. मग जेव्हा नमाज पूर्ण होईल तेव्हा धरतीवर (इतस्ततः) पसरा आणि अल्लाहची कृपा शोधा आणि अल्लाहचे अत्याधिक स्मरण करा, यासाठी की तुम्ही सफलता प्राप्त करून घ्यावी.

11

११. आणि जेव्हा एखादा सौदा विकताना पाहतात किंवा एखादा तमाशा दृष्टीस पडला असता त्याकडे धावतात आणि तुम्हाला उभेच सोडून देतात. (तुम्ही) सांगा की अल्लाहजवळ जे काही आहे ते खेळ आणि व्यापारापेक्षा अधिक चांगले आहे आणि अल्लाह सर्वांत चांगला रोजी देणारा (अन्नदाता) आहे.