ऑल इस्लाम लायब्ररी
1

१. ता.हा.

2

२. आम्ही या कुरआनाचे अवतरण तुमच्यावर अशासाठी केले नाही की तुम्ही कष्ट- यातनाग्रस्त व्हावे.

3

३. किंबहुना त्याच्या बोध- उपदेशाकरिता, जो अल्लाहचे भय राखतो.

4

४. याचे अवरण त्याच्याचतर्फे आहे, ज्याने जमिनीला आणि उंच उंच आकाशांना निर्माण केले आहे.

5

५. जो अतिशय दयावान आहे, अर्श (ईशसिंहासना) वर विराजमान आहे.

6

६. आकाशांमध्ये आणि धरतीवर आणि यांच्या दरम्यान आणि जमिनीच्या पातळीखाली प्रत्येक ठिकाणी त्याची राज्यसत्ता आहे. (अर्थात या सर्वांचा एकमेव बादशहा तोच आहे.)

7

७. तुम्ही आपले म्हणणे उंच स्वरात सांगा किंवा हळू आवाजात, तो तर लपलेली आणि गुप्त स्वरुपाची गोष्टही चांगल्या प्रकारे जाणतो.

8

८. तोच अल्लाह होय, ज्याच्याखेरीज कोणीही सच्चा (खराखुरा) उपास्य नाही. सर्व उत्तमोत्तम नावे त्याचीच आहेत.

9

९. तुम्हाला मूसाचा वृत्तांत तर माहीतच आहे.

10

१०. जेव्हा त्यांनी आग पाहून आपल्या कुटुंबीयांना म्हटले की थोडा वेळ इथे थांबा, मला आग दिसत आहे. खूप शक्य आहे की मी त्या आगीचा निखारा तुमच्याजवळ आणावा किंवा आगीजवळून उचित रस्त्याची बातमी प्राप्त करून घ्यावी.

11

११. जेव्हा ते त्या ठिकाणी पोहोचले, तेव्हा आवाज ऐकू आला की, हे मूसा!

12

१२. निःसंशय, मीच तुमचा स्वामी व पालनकर्ता आहे. तुम्ही आपल्या पायातले जोडे उतरवा कारण तुम्ही ‘तोवा’च्या पवित्र मैदानात आहात.

13

१३. आणि मी तुमची निवड केली आहे. आता जी वहयी (प्रकाशना) केली जाईल तिला लक्षपूर्वक ऐका.

14

१४. निःसंशय, मीच अल्लाह आहे. माझ्याखेरीज उपासना करण्यायोग्य दुसरा कोणीही नाही, यास्तव तुम्ही माझीच उपासना करा आणि माझ्या स्मरणार्थ नमाज कायम करा.

15

१५. कयामत हमखास येणार आहे, जिला मी गुप्त ठेवू इच्छितो यासाठी की प्रत्येक माणसाला तो मोबदला प्रदान केला जावा, जो त्याने प्रयत्न केला असेल.

16

१६. तेव्हा आता यावर ईमान राखण्यापासून तुम्हाला अशा माणसाने रोखू नये, जो यावर ईमान राखत नसेल आणि आपल्या इच्छा आकांक्षांच्या मागे धावत असेल, अन्यथा तुम्ही नाश पावाल.

17

१७. आणि हे मूसा! तुमच्या उजव्या हातात काय आहे?

18

१८. उत्तर दिले, ही माझी लाठी आहे, जिच्यावर मी टेका (आधार) घेतो आणि जिच्याद्वारे मी आपल्या शेळ्यांकरिता झाडाची पाने खाली पाडून घेतो आणि तिच्यापासून मला दुसरेही अनेक फायदे आहेत.

19

१९. (अल्लाहने) फर्माविले, हे मूसा, तिला (हातातून) खाली टाका.

20

२०. तेव्हा खाली टाकताच साप बनून धावू लागली.

21

२१. फर्माविले निर्भय होऊन तिला धरा, आम्ही तिला त्याच पहिल्या अवस्थेत पुन्हा आणू.

22

२२. आणि आपला हात आपल्या काखेत (बगलेत) घाला, तेव्हा तो सफेद, प्रकाशमान होताना बाहेर निघेल, मात्र कसल्याही व्यंग-दोष आणि आजाराविना. हा दुसरा ईश-चमत्कार आहे.

23

२३. हे अशासाठी की आम्ही तुम्हाला आपल्या मोठमोठ्या निशाण्या दाखवू इच्छितो.

24

२४. आता, तुम्ही फिरऔनकडे जा, त्याने मोठा उत्पात माजविला आहे.

25

२५. (मूसा) म्हणाले, हे माझ्या पालनकर्त्या! माझी छाती माझ्याकरिता उघड (मोकळी) कर.

26

२६. आणि माझे कार्य माझ्यासाठी सोपे कर.

27

२७. आणि माझ्या जीभेची गाठ सोडव.

28

२८. यासाठी की लोकांनी माझे म्हणणे चांगल्या प्रकारे समजू शकावे.

29

२९. आणि माझा वजीर माझ्या कुटुंबीयांपैकी बनव.

30

३०. (अर्थात) माझा भाऊ हारूनला.

31

३१. तू त्याच्याद्वारे माझी कंबर मजबूत कर.

32

३२. आणि त्याला माझ्या कार्यात सहाय्यक बनव.

33

३३. यासाठी की आम्ही दोघांनी तुझी खूप खूप स्तुती-प्रशंसा वर्णन करावी.

34

३४. आणि तुझे अधिकाधिक स्मरण करावे.

35

३५. निःसंशय, तू आमची चांगल्या प्रकारे देखभाल करणारा आहेस.

36

३६. (अल्लाहने) फर्माविले, हे मूसा! तुमच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या गेल्या.

37

३७. आणि आम्ही तर तुमच्यावर आणखी एकदा याहून मोठा उपकार केला आहे.

38

३८. जेव्हा आम्ही तुमच्या मातेच्या मनात ते अवतरित केले, ज्याचे वर्णन या वेळी केले जाते आहे.

39

३९. की तुम्ही, या (बाळा) ला लाकडी पेटीत ठेवून तिला बंद करून नदीत सोडून द्या, मग नदी त्या पेटीला किनाऱ्यावर नेईल आणि माझा व त्याचा स्वतःचा शत्रू तिला घेईल आणि मी आपल्यातर्फे विशेष प्रेम आणि पसंतीचा तुमच्यावर वर्षाव केला यासाठी की तुमचे पालनपोषण माझ्या डोळ्यादेखत केले जावे.१

40

४०. (स्मरण करा) जेव्हा तुमची बहीण जात होती आणि सांगत होती की, तुम्ही म्हणत असाल तर मी त्याचा पत्ता सांगू जो या (बाळा) ची देखरेख ठेवणारा बनू शकेल. अशा प्रकारे आम्ही तुम्हाला पुन्हा तुमच्या मातेजवळ पाठविले, यासाठी की तिचे नेत्र शितल राहावेत आणि ती दुःखी होऊ नये आणि तुम्ही एका माणसाचा वध केला होता, त्या उपरान्त आम्ही तुम्हाला दुःखापासून वाचविले, अर्थात आम्ही तुमची चांगल्या प्रकारे कसोटी घेतली, मग तुम्ही अनेक वर्षापर्यंत मदयनच्या लोकांमध्ये निवास केला, मग अल्लाहच्या लिखित भाग्यानुसार हे मूसा तुम्ही आले.

41

४१. आणि मी तुम्हाला विशेषतः आपल्यासाठी पसंत केले.

42

४२. आता तुम्ही आपल्या भावासह माझ्या निशाण्यांसोबत घेऊन जा, खबरदार! तुम्ही दोघेही माझे स्मरण करण्यात सुस्ती करू नका.

43

४३. तुम्ही दोघे फिरऔनच्या जवळ जा. त्याने मोठा विद्रोह केला आहे.

44

४४. त्याला नरमीने समाजावून सांगा, कदाचित त्याने ध्यानी घ्यावे किंवा (अल्लाहचे) भय बाळगावे.

45

४५. दोन्ही म्हणाले, हे आमच्या पालनकर्त्या! आम्हाला भय वाटते की कदाचित फिरऔनने आमच्यावर एखादा अत्याचार न करावा, किंवा आपल्या बंडखोरीत आणखी वाढावा.

46

४६. उत्तर मिळाले की तुम्ही कधीही भय राखू नका, मी सदैव तुमच्या सोबतीला आहे आणि ऐकत व पाहत राहीन.

47

४७. तुम्ही त्याच्याजवळ जाऊन त्याला सांगा की आम्ही तुझ्या पानलकर्त्याचे पैगंबर (ईशदूत) आहोत. तू आमच्या सोबत इस्राईलच्या संततीला पाठव, त्यांच्या शिक्षा-यातना संपव. आम्ही तर तुझ्याजवळ, तुझ्या पालनकर्त्यातर्फे निशाण्या घेऊन आलो आहोत. शांती सलामती फक्त त्याच्याचकरिता आहे, जो मार्गदर्शनाचा मजबूतपणे अंगिकार करेल.

48

४८. आमच्याकडे वहयी (प्रकाशना) केली गेली आहे की जो खोटे ठरविल. आणि तोंड फिरविल, त्याच्याकरिता अज़ाब (शिक्षा-यातना) आहे.

49

४९. (फिरऔनने) विचारले की हे मूसा! तुम्हा दोघांचा पालनकर्ता कोण आहे?

50

५०. उत्तर दिले की आमचा पालनकर्ता तो आहे, ज्याने प्रत्येकाला त्याचे खास रूप प्रदान केले, मग मार्गदर्शनही दिले.

51

५१. फिरऔन म्हणाला, (बरे हे सांगा) पूर्वी होऊन गेलेल्या लोकांची काय अवस्था झाली?

52

५२. उत्तर दिले, त्यांचे ज्ञान माझ्या पालनकर्त्याजवळ ग्रंथात आहे. माझा पालनकर्ताना चूक करतो, ना विसरतो.

53

५३. त्यानेच तुमच्यासाठी जमिनीला अंथरुण (बिछाना) बनविले आहे आणि त्यात तुमच्या चालण्यासाठी रस्ते बनविले आहेत, आणि आकाशातून पर्जन्यवृष्टी देखील तोच करतो, मग त्या पावसाद्वारे अनेक प्रकारची पैदावारही आम्ही निर्माण करतो.

54

५४. तुम्ही स्वतः खा आणि आपल्या जनावरांनाही चारा. निःसंशय यात बुद्धिमानांकरिता अनेक निशाण्या आहेत.

55

५५. त्याच धरतीमधून आम्ही तुम्हाला निर्माण केले आणि तिच्यातच पुन्हा परत पाठवू आणि तिच्यातूनच तुम्हा सर्वांना बाहेर काढून उभे करू.

56

५६. आणि आम्ही त्याला सर्व निशाण्या दाखविल्या, परंतु तरीही त्याने खोटे ठरविले आणि इन्कार केला.

57

५७. तो म्हणाला, हे मूसा! काय तू आमच्याजवळ अशासाठी आला आहे की आम्हाला आपल्या जादूच्या सामर्थ्याने आमच्या देशातून बाहेर काढावे.

58

५८. ठीक आहे. मग आम्हीही तुमचा सामना करण्यासाठी अशीच जादू जरूर आणू. तेव्हा तुम्ही आमच्या आणि आपल्या दरम्यान वायद्याची वेळ निश्चित ठरवून घ्या की ना आम्ही त्याविरूद्ध करावे आणि ना तुम्ही. मोकळ्या मैदानात ही स्पर्धा व्हावी.

59

५९. (मूसा यांनी) उत्तर दिले, शोभा सजावट आणि समारंभाच्या दिवसाचा वायदा आहे, आणि हे की लोकांनी दिवस चढताच जमा व्हावे.

60

६०. नंतर फिरऔन परतला आणि त्याने आपले डावपेच गोळा केले मग आला.

61

६१. मूसा त्याला म्हणाले की तुमचा नाश होवो, अल्लाहवर खोटे नाटे आणि लांछन लावू नका की (ज्यामुळे) त्याने तुमचा शिक्षा-यातनेद्वारे सर्वनाश करून टाकावा. लक्षात ठेवा! ज्याने असत्य रचले, तो कधीही सफल होणार नाही.

62

६२. मग हे लोक आपसात सल्लामसलत करण्यात एकमेकांविरूद्ध मताचे झाले आणि लपून छपून कानगोष्टी करू लागले.

63

६३. म्हणाले, हे दोघे फक्त जादूगार आहेत आणि यांचा पक्का इरादा आहे की आपल्या जादूच्या शक्तीने तुम्हाला तुमच्या देशाबाहेर घालवावे आणि तुमच्या उत्तम धर्माचा सत्यानाश करून टाकावा.

64

६४. तेव्हा तुम्ही देखील आपले कोणतेही डावपेच बाकी ठेवू नका, मग पंक्तीबद्ध होऊन रांगेत या, आज जो वर्चस्वशाली होईल तोच बाजी जिंकेल.

65

६५. ते म्हणू लागले की हे मूसा! एक तर तुम्ही आधी टाका किंवा आम्ही प्रथम टाकणारे बनावे.

66

६६. उत्तर दिले, नाही तुम्हीच अगोदर टाका. आता तर मूसा यांना असे वाटू लागले की त्यांच्या त्या दोऱ्या आणि काठ्या त्यांच्या जादूच्या शक्तीने धावत जात आहेत.

67

६७. अशाने मूसा मनातल्या मनात भिऊ लागले.

68

६८. आम्ही फर्माविले, अजिबात भिऊ नका. निःसंशय तुम्हीच वर्चस्वशाली आणि उच्च राहाल.

69

६९. आणि तुमच्या उजव्या हातात जे आहे ते खाली टाका की त्यांच्या कारागिरीला याने गिळून टाकावे त्यांनी जे काही बनविले आहे ते केवळ जादूगारांचे कला कौशल्य आहे आणि जादूगार कोठूनही येवो, सफल होत नाही.

70

७०. आता तर सर्वच्या सर्व जादूगार सजद्यात पडले आणि अकस्मात उद्गारले की आम्ही तर हारुन आणि मूसाच्या पालनकर्त्यावर ईमान राखले.

71

७१. (फिरऔन) म्हणाला, काय माझा आदेश होण्यापूर्वीच तुम्ही त्याच्यावर ईमान राखले? निःसंशय हाच तुमचा तो मोठा गुरू आहे, ज्याने तुम्हा सर्वांना जादू शिकविली आहे (ऐका) मी तुमचे हात पाय विरूद्ध दिशेने कापवून तुम्हा सर्वांना खजूरीच्या फांद्यांवर फासावर लटकविन आणि तुम्हाला पूर्णतः माहीत पडेल की आमच्यापैकी कोणाची सजा अधिक सक्त आणि जास्त काळ टिकणारी आहे.

72

७२. (त्यांनी) उत्तर दिले की, असंभव आहे की आम्ही तुम्हाला प्राधान्य द्यावे त्या प्रमाणांवर, जी आमच्या समोर येऊन पोहोचलीत आणि त्या अल्लाहवर, ज्याने आम्हाला निर्माण केले. आता, तू वाटेल ते कर. तू जो काही आदेश चालवू शकतो तो या जगाच्या जीवनातच आहे.

73

७३. आम्ही (या आशेने) आपल्या पालनकर्त्यावर ईमान राखले की त्याने आमचे अपराध माफ करावेत आणि प्रामुख्याने जादूगारी (चे पाप) जे काही तू आमच्याकडून विवशतेने करवून घेतले आहे. अल्लाहच सर्वांत उत्तम आणि सदैव काळ राहणारा (चिरस्थायी) आहे.

74

७४. तात्पर्य हेच की जो कोणी अपराधी बनून अल्लाहच्या ठिकाणी जाईल, त्याच्यासाठी जहन्नम आहे, जिथे न मृत्यु असेल, न जीवन!

75

७५. आणि जो कोणी त्याच्याजवळ ईमानधारक बनून जाईल आणि त्याने सत्कर्मेही केली असतील तर त्याच्यासाठी उच्च आणि चांगले दर्जे आहेत.

76

७६. कायमस्वरूपी जन्नत, ज्यांच्याखाली नद्या वाहत असतील, जिथे ते सदासर्वदा राहतील. हाच मोबदला आहे अशा त्या प्रत्येक माणसाचा जो पवित्र (पापमुक्त) आहे.

77

७७. आणि आम्ही मूसाकडे वहयी (प्रकाशना) अवतरित केली की तुम्ही रात्रीतूनच माझ्या दासांना घेऊन चला आणि त्यांच्यासाठी समुद्रात कोरडा मार्ग बनवून घ्या, मग ना तुम्हाला कोणाच्या येऊन धरण्याचे भय राहील ना धास्ती.

78

७८. फिरऔनने आपल्या सैन्यासह त्यांचा पाठलाग केला, मग तर समुद्र त्या सर्वांवर आच्छादित झाला जसे काही आच्छादित होणार होते.

79

७९. आणि फिरऔनने आपल्या जनसमूहाला मार्गभ्रष्टतेत टाकले आणि सरळ मार्ग दाखविला नाही.

80

८०. हे इस्राईलच्या पुत्रांनो! (पाहा) आम्ही तुम्हाला तुमच्या शत्रुच्या तावडीतून मुक्त केले आणि तुम्हाला तूर पर्वताच्या उजवीकडचे वचन दिले आणि तुमच्यावर मन्न आणि सलवा उतरविला.

81

८१. तुम्ही, आम्ही प्रदान केलेली स्वच्छ शुद्ध रोजी (आजिविका) खा आणि त्यात मर्यादेचे उल्लंघन करू नका अन्यथा तुमच्यावर माझा प्रकोप उतरेल तो निश्चितच नाश पावेल.

82

८२. आणि निश्चितच मी त्यांना माफ करणार आहे जे माफी मागतील ईमान राखतील सत्कर्मे करतील आणि सरळ मार्गावरही राहतील.१

83

८३. आणि हे मूसा! तुम्हाला आपला जनसमूहाशी (गाफील करून) कोणत्या गोष्टीने लवकर आणले?

84

८४. सांगितले ते लोक माझ्या पाठोपाठच आहेत आणि मी, हे पालनकर्त्या घाई अशासाठी केली की तू प्रसन्न व्हावे.

85

८५. फर्माविले, आम्ही तुमच्या जनसमूहाला तुमच्या पश्चात कसोटीत टाकले आणि त्यांना सामरीने मार्गभ्रष्ट करून टाकले.

86

८६. तेव्हा मूसा अतिशय क्रोधित आणि दुःखी होऊन परतले आणि म्हणाले की हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! काय तुमच्याशी तुमच्या पालनकर्त्याने चांगला वायदा केला नव्हता? काय त्याची मुदत तुम्हाला दीर्घ स्वरूपाची वाटली? की तुमचा इरादाच हा आहे की तुमच्यावर तुमच्या पालनकर्त्याचा प्रकोप कोसळावा, म्हणून तुम्ही माझा वायदा तोडून टाकला.

87

८७. (लोकांनी) उत्तर दिले, आम्ही आपल्या अधिकाराने तुमच्याशी केलेला वायदा तोडला नाही, किंबहुना आमच्यावर जे दागिने, लोकांचे लादले गेले होते, ते आम्ही टाकून दिले आणि त्याचप्रमाणे सामरीने देखील टाकले.

88

८८. मग त्याने लोकांसाठी एक वासरू घडविले अर्थात वासराची मूर्ती ज्याचा गायीसारखा आवाज होता, मग म्हणाले की हाच तुमचाही माबूद (उपास्य) आहे आणि मूसाचा देखील, परंतु मूसाला विसर पडला.

89

८९. काय हे वाट चुकलेले लोक हेही पाहत नाही की ते तर त्यांच्या बोलण्याला उत्तरही देऊ शकत नाही आणि न त्यांच्या कसल्याही चांगल्या वाईटाचा अधिकार बाळगतो.

90

९०. आणि हारूनने यापूर्वीही त्यांना सांगितले होते की हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! या वासराद्वारे तर तुमची परीक्षा घेतली गेली आहे. तुमचा सच्चा पालनहार तर दयावान अल्लाहच आहे, तेव्हा तुम्ही सर्व माझे अनुसरण करा आणि माझे म्हणणे मानत जा.

91

९१. (त्यांनी) उत्तर दिले मूसाचे आगमन होईपर्यंत आम्ही तर याचेच पुजारी बनून राहू.

92

९२. (मूसा) म्हणाले, हे हारून! यांना मार्गभ्रष्ट होत असलेले पाहून (त्यांना रोखण्यात) तुम्हाला कोणत्या गोष्टीने रोखून ठेवले होते?

93

९३. की ज्यामुळे तू माझ्या पाठोपाठ आला नाही, काय तू देखील माझी अवज्ञा करणारा बनलास?

94

९४. (हारून) म्हणाले, हे माझ्या मातेच्या पुत्रा! माझी दाढी धरू नका, आणि डोक्याचे केस ओढू नका. माझ्या मनात तर केवळ हाच विचार आला आहे की कदाचित तुम्ही असे न म्हणावे की तू इस्राईलच्या संततीत फूट पाडलीस आणि माझ्या बोलण्याची (आदेशाची) वाट पाहिली नाही.

95

९५. (मूसा यांनी) विचारले, सामरी तुझा काय मामला आहे?

96

९६. (त्याने) उत्तर दिले, मला ते दिसले, जे त्यांना दिसले नाही, तेव्हा मी अल्लाहने पाठविलेल्या पाऊलखुणांतून एक मूठ भरून घेतली. तिला त्यात टाकले. अशा प्रकारे माझ्या मनाने माझ्यासाठी ही गोष्ट रचली.

97

९७. सांगितले, ठीक आहे. जा, या जगाच्या जीवनात तुझी शिक्षा हीच की तू म्हणत राहावे, मला स्पर्श करू नका आणि एक दुसरा वायदाही तुझ्याशी आहे, जो तुझ्यावरून कधीही टाळणार नाही आणि आता तू आपल्या या दैवतालाही पाहा, ज्याचा तू पुजारी बनला होता, आम्ही त्याला जाळून टाकू, मग त्याला नदीत चूरेचूर उडवून देऊ.१

98

९८. निःसंशय, तुम्हा सर्वांचा माबूद (उपास्य) केवळ अल्लाहच आहे. त्याच्याखेरीज दुसरा कोणीही उपास्य नाही. त्याचे ज्ञान समस्त वस्तूंवर प्रभावी आहे.

99

९९. अशा प्रकारे आम्ही तुमच्यासमोर पूर्वी होऊन गेलेल्या घटनांचे वर्णन करतो, आणि निःसंशय आम्ही तुम्हाला आपल्याकडून बोध- उपदेश प्रदान केलेला आहे.

100

१००. यापासून जो तोंड फिरवेल तो निश्चितच कयामतच्या दिवशी आपले अवजड ओझे लादलेल्या स्थितीत असेल.

101

१०१. ज्यात तो नेहमीच राहील आणि अशांकरिता कयामतच्या दिवशी (मोठे) भयंकर ओझे आहे.

102

१०२. ज्या दिवशी सूर (शंख) फुंकला जाईल आणि अपराधी लोकांना आम्ही त्या दिवशी (भीतीमुळे) निळ्या पिवळ्या डोळ्यांसह घेरून आणू.

103

१०३. ते आपसात हळू हळू बोलत असतील की आम्ही तर (जगात) केवळ दया दिवसच राहिलो.

104

१०४. जे काही ते बोलत आहेत, त्याची हकीगत आम्ही जाणतो. त्यांच्यातला सर्वांत चांगल्या मार्गाचा इसम म्हणत असेल, तुम्ही फक्त एकच दिवस राहिलेत.

105

१०५. ते तुम्हाला पर्वतांबद्दल विचारतात, तर (तुम्ही) सांगा की पर्वतांना माझा पालनकर्ता (अल्लाह) चूरेचूरे करून उडवून देईल.

106

१०६. आणि (जमिनी) ला समतल सपाट मैदान करून टाकील.

107

१०७. ज्यात ना कोठे वळण दिसेल, ना उंच सखल भाग.

108

१०८. ज्या दिवशी लोक पुकारणाऱ्याच्या मागे चालतील, ज्यात कसलीही कमी होणार नाही आणि दयावान अल्लाहच्या समोर सर्वांचे आवाज दबलेले असतील, कुजबुजखेरीज तुम्हाला काहीच ऐकू येणार नाही.

109

१०९. त्या दिवशी कोणाची शिफारस काहीच कामी येणार नाही, तथापि ज्याला दयावान अल्लाह तसा आदेश देईल, आणि त्याचे म्हणणे पसंत करील.

110

११०. जे काही त्यांच्या पुढे आणि मागे आहे, ते (अल्लाहच) जाणतो. त्याच्या निर्मितीपैकी कोणीही त्याला आपल्या ज्ञानकक्षेत घेऊ शकत नाही.

111

१११. आणि सर्वांचे चेहरे त्या चिरसजीव आणि चिरस्थायी अल्लाहसमोर मोठ्या नम्रतेने झुकलेले असतील. निःसंशय, जो आपल्या पाठीवर अत्याचाराचे ओझे लावून येईल तो असफल ठरेल.

112

११२. आणि जो कोणी सत्कर्म करील, आणि ईमानधारकही असेल तर त्याला ना जुलूम अत्याचाराचे भय राहील, ना हक्क मारला जाण्याचे.

113

११३. आणि अशा प्रकारे आम्ही तुमच्यावर अरबी (भाषेत) कुरआन अवतरित केले आहे आणि अनेक प्रकारे त्यात शिक्षेची भीती सांगितली आहे, यासाठी की लोकांनी अल्लाहचे भय राखून दुराचारापासून अलिप्त राहणारे बनावे किंवा त्यांच्या मनात विचारचिंतन निर्माण व्हावे.

114

११४. अशा प्रकारे अल्लाह सर्वांत मोठा सच्चा आणि खराखुरा स्वामी आहे. तुम्ही कुरआन पठण करण्यात घाई करू नका, याआधी की तुमच्याकडे जी वहयी (प्रकाशना) केली जाते, ती पूर्ण केली जावी आणि असे म्हणा की, पालनकर्त्या! माझे ज्ञान आणखी वाढव.

115

११५. आणि आम्ही आदमला अगोदरच ताकीदपूर्ण आदेश दिला होता, परंतु त्यांना त्याचा विसर पडला आणि आम्हाला त्यांच्यात कोणताही दृढनिश्चय आढळला नाही.

116

११६. आणि जेव्हा आम्ही फरिश्त्यांना सांगितले की आदमला सजदा करा तेव्हा इब्लिसखेरीज सर्वांनी सजदा केला, त्याने साफ इन्कार केला.

117

११७. तेव्हा आम्ही सांगितले, हे आदम! हा तुमचा आणि तुमच्या पत्नीचा शत्रु आहे (लक्षात ठेवा) असे न व्हावे की त्याने तुम्हा दोघांना जन्नतमधून बाहेर घालवावे, ज्यामुळे तुम्ही संकटात सापडावे.

118

११८. इथे तर तुम्हाला ही सवलत आहे की ना तुम्ही उपाशी राहता, ना नग्न.

119

११९. आणि इथे ना तुम्ही तहानलेले राहता, ना उन्हाने त्रस्त राहता.

120

१२०. परंतु सैतानाने आदमच्या मनात कुविचार टाकला, म्हणाला, हे आदम! काय मी तुम्हाला चिरस्थायी जीवनाचा वृक्ष आणि त्या राज्यसत्तेची खबर देऊ जी कधीही जुनी न व्हावी.

121

१२१. यास्तव त्या दोघांनी त्या झाडातून काही खाल्ले, मग त्यांची गुप्तांगे उघडी झालीत आणि ते जन्नतची पाने आपल्या अंगावर चिकटवू लागले. आदमने आपल्या पालनकर्त्याची अवज्ञा केली आणि बहकले.

122

१२२. मग त्यांच्या पालनकर्त्याने त्यांना उपकृत केले, आदमची तौबा कबूल केली आणि त्यांचे मार्गदर्शन केले.

123

१२३. (अल्लाहने) फर्माविले, तुम्ही दोघेही इथून खाली उतरा. तुम्ही आपसात एकमेकांचे शत्रू आहात. आता तुमच्याजवळ जेव्हा कधीही माझ्याकडून मार्गदर्शन पोहचेल, तर जो कोणी माझ्या मार्गदर्शनाचे पालन करील तर तो न बहकेल, ना कष्ट- यातनाग्रस्त होईल.

124

१२४. आणि जो कोणी माझ्या स्मरणापासून तोंड फिरविल, त्याचे जीवन तंगी- अडचणीचे राहील आणि कयामतच्या दिवशी आम्ही त्याला आंधळा करून उठवू.

125

१२५. (तो) म्हणेल, हे पालनकर्त्या! मला तू आंधळा बनवून का उठविले? वास्तविक मी चांगले बघू शकत होतो.

126

१२६. उत्तर मिळेल, असेच व्हायला पाहिजे होते. तू माझ्या (तर्फे) आलेल्या आयातींचा विसर पाडला, तद्‌वतच आज तुझाही विसर पाडला जात आहे.

127

१२७. आणि आम्ही असाच मोबदला प्रत्येक माणसाला देत असतो, जो मर्यादेचे उल्लंघन करील आणि आपल्या पालनकर्त्याच्या आयतींवर ईमान न राखेल आणि निःसंशय आखिरत (मरणोत्तर जीवना) चा अज़ाब मोठा सक्त आणि चिरस्थायी आहे.

128

१२८. काय त्यांना या गोष्टीनेही मार्गदर्शन केले नाही की आम्ही त्यांच्यापूर्वी अनेक वस्त्या नष्ट करून टाकल्या आहेत. ज्या राहणाऱ्यांच्या जागेवर हेच चालत फिरत आहे निःसंशय अक्कलवान लोकांसाठी यात अनेक निशाण्या आहेत.

129

१२९. आणि तुमच्या पालनकर्त्याचा फैसला पाहिल्यापासून निर्धारित आणि काळ ठरविला गेलेला नसता तर याच क्षणी विनाश येऊन बिलगला असता.

130

१३०. तेव्हा त्यांच्या बोलण्यावर धीर- संयम राखा आणि आपल्या पालनकर्त्याची पवित्रता आणि महानता वर्णन करीत राहा, सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तापूर्वी आणि रात्रीच्या वेगवेगळ्या हिश्श्यांमध्येही आणि दिवसाच्या हिश्श्यांमध्येही अल्लाहचे गुणगान करीत राहा. (अशाने) फार शक्य आहे की तुम्ही आनंदित व्हाल.

131

१३१. आणि आपली नजर कधीही त्या वस्तूंवर टाकू नया, ज्या आम्ही त्यांच्यापैकी अनेक लोकांना ऐहिक शोभा- सजावटीसाठी देऊन ठेवल्या आहेत, यासाठी की याद्वआरे त्यांची कसोटी घ्यावी. तुमच्या पालनकर्त्याने प्रदान केलेलेच (फार) उत्तम आणि बाकी राहणारे आहे.

132

१३२. आणि आपल्या कुटुंबीयांना नमाजचा आदेश द्या आणि स्वतःही त्यावर दृढतापूर्वक राहा. आम्ही तुमच्याकडून रोजी (आजिविका) मागत नाही, उलट आम्ही स्वतः तुम्हाला रोजी देतो, शेवटी चांगली परिणती नेक व सदाचारी लोकांचीच होते.

133

१३३. आणि (ते) म्हणाले की या (पैगंबरां) ने आमच्यासाठी आपल्या पालनकर्त्यातर्फे एखादी निशाणी का नाही आणली? काय त्यांच्याजवळ पूर्वीच्या ग्रंथांच्या स्पष्ट निशाण्या पोहचल्या नाहीत?

134

१३४. आणि जर आम्ही याच्या आधीच त्यांना अज़ाबद्वारे नष्ट करून टाकले असते, तर खात्रीने असे म्हणाले असते की हे आमच्या पालनकर्त्या! तू आमच्याजवळ आपला रसूल (ईशदूत) का नाही पाठविला की आम्ही तुझ्या आयतींचे पालन केले असते, यापूर्वी की आम्ही अपमानित झालो असतो आणि धिःक्कारले गेले असतो.

135

१३५. त्यांना सांगा, प्रत्येकजण परिणामाच्या प्रतिक्षेत आहे, तेव्हा तुम्ही सुद्धा प्रतिक्षेत राहा. लवकरच पूर्णतः जाणून घ्याल की सरळ मार्गावर असलेले कोण आहेत आणि मार्ग प्राप्त केलेले कोण आहेत?