1
१. खडखडविणारी.
2
२. काय आहे ती खडखडविणारी.
3
३. तुम्हाला काय माहीत की ती खडखडविणारी काय आहे?
4
४. ज्या दिवशी माणसे इतस्ततः विखुरलेल्या कीटक पतंगांप्रमाणे होतील.
5
५. आणि पर्वत, पिंजलेल्या रंगीत लोकरीसारखे होतील.
6
६. मग ज्याचे पारडे वजनात भारी असेल
7
७. तर तो ऐष-आरामाच्या जीवनात असेल.
8
८. आणि ज्याचे पारडे वजनात हलके असेल
9
९. तर त्याचे ठिकाण ‘हाविया’ आहे.
10
१०. आणि तुम्हाला काय माहीत की ती काय आहे.
11
११. ती खूप प्रखरतेने भडकत असलेली आग आहे.